देशात हिंदू-मुस्लिम दंगे भडकवले जातील; आंबेडकर यांनी व्यक्त केली भीती

सध्याच्या सरकारचे सर्व आघाडयावरील अपयश आता सर्वांसमोर आले आहे. कोरोनाकाळात नागरिकांना सोयी सुविधा देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाईल, अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. ते मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

    मुंबई : सध्याच्या सरकारचे सर्व आघाडयावरील अपयश आता सर्वांसमोर आले आहे. कोरोनाकाळात नागरिकांना सोयी सुविधा देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम दंगे भडकवण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाईल, अशी भीती वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. ते मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

    चिथावणीसाठी भावनिक, धार्मिक डावपेच

    आता मुस्लिम आणि इतर धार्मिक समूहांना भडकविण्यासाठी उचकवण्यासाठी भावनिक आणि धार्मिक डावपेच वापरले जातील. काही संघटनांकडून भावनिक व धार्मिक मुद्यांना हात घातला जाईल, पवित्र कुराण, पैगंबर मोहम्मद स.अ. आणि इतर धार्मिक गुरू अथवा व्यक्तिमत्वांच्या संदर्भाने निंदनीय व आक्षेपार्ह भाषा वापरून समाजाला चिथावले जाईल व देशात दंगलीचे वातावरण तयार केल जाईल अशी भिती प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

    ‘सदभावना’ कायद्याचा प्रस्ताव

    देशात सध्याच्या परिस्थिती संदर्भाने विचार केल्यास देशात धार्मिक, सामजिक आणि वांशिक भावना कलुषित करण्याचे काम केले जावू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीने सदभावना कायम रहावी यासाठी कायद्याचा प्रस्ताव मांडला आहे. येत्या काळात होऊ घातलेल्या संसद आणि राज्य विधानसभेच्या अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल, याची दक्षता घेण्याची जबाबदारी असेल, असे आवाहन आंबेडकर यानी यावेळी केले. स्वातंत्र्योतर काळात भारतीय समाज लहान मोठ्या अश्या बऱ्याच जातीय दंगलींचा साक्षीदार राहिला आहे, ज्या मध्ये अनेक माणसांचे बळी गेले. हिंदू, मुस्लीम, शीख, पारशी व बौद्धांना जागरूकता आल्याने अनेक जीव घेतलेल्या सांप्रदायिक दंगलींमागील कार्यपद्धती आता जनतेला समजली आहे. ही सगळी कारस्थाने अपयशी ठरतात तेंव्हा बाँबलास्ट आणि मॉबलिंचींगसारखी कृत्य केली जातात, असेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

    हे सुद्धा वाचा