ऐतिहासिक काँग्रेस पक्ष काही राज्यात इतिहासजमा; संजय राऊतांचा टोला

काँग्रेस पक्ष हा 100 वर्षांहून जुना पक्ष आहे. तो पक्ष तसा ऐतिहासिकही आहे. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता काँग्रेस पक्ष तर काही राज्यांमध्ये इतिहासजमा झालेला आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला लगावला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला आहे. पटोलेंची वक्तव्ये फारशी चर्चेत नसतात, असा चिमटा त्यांनी काढला आहे. पटोले स्वबळाचे नारे देत आहे. त्यानुसार, काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील, असे भाकितही राऊत यांनी केले आहे.

    मुंबई : काँग्रेस पक्ष हा 100 वर्षांहून जुना पक्ष आहे. तो पक्ष तसा ऐतिहासिकही आहे. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता काँग्रेस पक्ष तर काही राज्यांमध्ये इतिहासजमा झालेला आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला लगावला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला आहे. पटोलेंची वक्तव्ये फारशी चर्चेत नसतात, असा चिमटा त्यांनी काढला आहे. पटोले स्वबळाचे नारे देत आहे. त्यानुसार, काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील, असे भाकितही राऊत यांनी केले आहे.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिम वस्त्यांमध्ये शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राऊत यांनी संघाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली. परिवर्तन चांगले आहे. पण संघ इतका का बदलतोय याचा विचार झाला पाहिजे, असे सांगतानाच संघाने स्वत:ला बदलायचे ठरवले असेल तर त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहिले पाहिजे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. परिवर्तन चांगले आहे. संघ इतकी वर्ष आपण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडत आला.

    मतांसाठी आपण धार्मिक विभाजन आणि फाळणी करत आला. त्यात असंख्य हिंदू आणि मुस्लिमांचे बळी गेले. आता तर हे परिवर्तन होत असेल आणि त्यातून जर देशाच्या एकता आणि अखंडतेला बळ मिळत असेल तर संघ इतका का बदलतो आहे, या संदर्भात विचार केला पाहिजे, असे राऊत म्हणाले. संघाचे कार्य विविध क्षेत्रात नक्कीच चांगले आहे. त्यांच्या अनेक भूमिकांवर आम्ही चर्चा केल्या आहेत. त्यांच्या भूमिकाही स्वीकारल्या आहेत. ठीक आहे. संघाने जर स्वत:ला बदलायचे स्वीकारले असेल तर त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

    नाना पटोले विदर्भाच्या मातीतील रांगडे गडी आहेत. ते काय बोलतात आणि कसे डोलतात यावर सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही. महाराष्ट्र काँग्रेसला संजीवनी द्यायची व राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेवर आणायचेच हा विडा त्यांनी उचलला आहे. त्यामुळे त्यांच्या हिमतीस दाद द्यावीच लागेल. मात्र, पटोलेंच्या बोलण्यावर महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य अवलंबून नाही. मविआ सरकारला कोणताही धोका नाही.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना