History repeats itself, time is up, now is the time to say goodbye to the world; Sachin Waze's status shook the police force

पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे त्यांनी स्टेटसमध्ये म्हंटले आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची १७ वर्ष होती. आता, मात्र माझ्याकडे ना आयुष्याची १७ वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली आहे असं त्यांनी स्टेटसमध्ये म्हंटले आहे.

    मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांनी जामीनासाठी अर्ज केल्याची बातमी समोर आल्यानंतर आता त्यांच्या whatsapp status ने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

    वाझे यांनी एक whatsapp status ठेवला आहे. याचा स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. माझे सहकारी- अधिकारी मला चुकीच्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा सचिन वाझे यांनी whatsapp status द्वारे केला आहे.

    पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे त्यांनी स्टेटसमध्ये म्हंटले आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची १७ वर्ष होती. आता, मात्र माझ्याकडे ना आयुष्याची १७ वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली आहे असं त्यांनी स्टेटसमध्ये म्हंटले आहे.

    काय आहे नेमकं प्रकरण

    २५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात एटीएसकडून तपास सुरू आहे. या दरम्यानच्या काळात या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि स्कॉर्पिओचा मालक असलेल्या हिरेन मनसुख याचा मृतदेह मुंब्र्यातील रेती बंदरच्या खाडीत आढळून आला होता.

    या प्रकरणी विरोधकांनी वाझेंवर खळबजनक आरोप केलेत. तसेच वाझेच्या अटकेती मागणी करत विरोधकांनी विधानसभेत मोठा गदरोळ घालत होता. विरोधकांच्या दबावानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १० मार्च रोजी सभागृहातून वाझे यांना क्राइम ब्रांचमधून हटवण्यात आल्यांची घोषणा केली. त्यानंतर १२ मार्च रोजी रात्री उशीरा त्यांना क्राइम ब्रांचमधून नागरी सुविधा केंद्र विभागात हलवण्यात आले.