गृहमंत्री क्वारंटाईन होते, पण आयसोलेटेड नव्हते, ‘त्या’ काळात अनेकांना भेटले, फडणवीसांनी सादर केले पुरावे

गृहमंत्री अनिल देशमुख ५ ते १५ फेब्रुवारी या काळात हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. त्यामुळे ते कुणालाही भेटण्याचा आणि वसुलीचे आदेश देण्याचा संबंधच येत नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मात्र त्यांचा हा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढलाय. १७ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत गृहमंत्री क्वारंटाईन होते, मात्र आयसोलेटेड नव्हते, असा दावा फडणवीस यांनी केलाय. 

    मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र पाठवुून  केलेल्या आरोपानंतर राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं तूर्त तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठिशी घालण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं म्हटलंय. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरोप झालेल्या काळात देशमुखांना कोरोना झाला होता आणि ते क्वारंटाईन असल्यामुळे कुणालाही भेटलेच नसल्याचा दावा केला होता.

    गृहमंत्री अनिल देशमुख ५ ते १५ फेब्रुवारी या काळात हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. त्यामुळे ते कुणालाही भेटण्याचा आणि वसुलीचे आदेश देण्याचा संबंधच येत नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मात्र त्यांचा हा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढलाय. १७ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत गृहमंत्री क्वारंटाईन होते, मात्र आयसोलेटेड नव्हते, असा दावा फडणवीस यांनी केलाय.

    क्वारंटाईन असताना गृहमंत्री अनेकांना भेटलेले आहेत. त्याचे पुरावेदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे या काळात देशमुख कुणालाच भेटले नाहीत, हा पवारांचा दावा चुकीचा असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यामुळे शरद पवार यांच्या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचं फडणवीस म्हणाले.

    गुप्तवार्ता विभागाच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांनी बदल्यांच्या ऱॅकेटबाबतचा अहवाल दिला होता. ८ ऑगस्ट २०२० रोजीच हा अहवाल देण्यात आला होता. मात्र अद्यापही त्यावर कारवाई न झाल्यामुळे सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी हा अहवाल केंद्रीय गृहसचिवांना देणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिलीय.