गृहमंत्र्यांवर १०० कोटींची खंडणी वसुल करायला सांगीतल्याचा आरोप; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

परमबीर यांचे पत्र धक्कादायक असून तात्काळ गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा असे फडणवीस म्हणाले. या पत्राची गांभीर्याने दखल घेत निष्पक्षपाती चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.  राज्याच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. याची केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी व्हावी. राज्याला हे नको असल्यास न्यायालयीन व्हावी असेही फडणवीस म्हणाले.

    मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी वसुल करायला सांगीतल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी हा आरोप केलाय.
    राष्ट्रवादीने सर्व फेटाळले आहेत. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

    परमबीर यांचे पत्र धक्कादायक असून तात्काळ गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा असे फडणवीस म्हणाले. या पत्राची गांभीर्याने दखल घेत निष्पक्षपाती चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.  राज्याच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. याची केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी व्हावी. राज्याला हे नको असल्यास न्यायालयीन व्हावी असेही फडणवीस म्हणाले.

    दरम्यान, हे सर्व भाजपाचे षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केला आहे. परमबीर हे भाजपाचे खास आहेत. सरकारबाबत नाराजी नाही, त्यामुळे हा कट रचला गेला असल्याचे चव्हाण म्हणाल्या.  परमबीर सिंग यांना केंद्रात ऑफर दिली असण्याची शक्यताही चव्हाण यांनी वर्तवली आहे. १०० कोटींची मागणी फेटाळायला हवी होती. भाजपाचे हे षडयंत्र आहे. हे कुंभाड रचून देशमुख आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही विद्या चव्हाण यांनी केलाय.

    काय आहे नेमंक प्रकरण

    परमबीर सिंग हे मागील वर्षभरापासून मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत होते. अंबानी यांच्या निवासस्थानाजळव सापडलेली स्फोटकं कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या कथित आत्महत्याप्रकरण तसेच पोलिस अधिकारी सचिन वाझेंची अटक यावरुन उठलेल्या गदारोळामुळे परमबीर सिंग अडचणीत आले. अखेरीस सरकारने त्यांची पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली. अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे ते नाराज झाले. त्यांच्या प्रचंड अस्वस्थातता आली. यामुळे पदभार न घेताच ते रजेवर गेले.
    दरम्यान, सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी एक खुप मोठा गौप्यस्फोट केलाय. अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.