गृहमंत्री अमित शहांनी तात्काळ राजीनामा द्यावा; कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याची मागणी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज पुराव्या अभावी सीबीआयने क्लीनचिट दिली आहे. १०० कोटी वसुलीच्या आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर चौकशी चालू होती. देशमुख यांना क्लीनचिट मिळाल्यानंतर कॉंग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. अशी षड्यंत्रे फक्त हुकुमशाहीत घडतात. लोकशाही वाचवण्यासाठी संपूर्ण देश एकत्र येण्याची वेळ आली आहे. जाहीर निषेध! असे ट्विट कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्ला चढवला आहे.

  मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज पुराव्या अभावी सीबीआयने क्लीनचिट दिली आहे. १०० कोटी वसुलीच्या आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर चौकशी चालू होती. देशमुख यांना क्लीनचिट मिळाल्यानंतर कॉंग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. अशी षड्यंत्रे फक्त हुकुमशाहीत घडतात. लोकशाही वाचवण्यासाठी संपूर्ण देश एकत्र येण्याची वेळ आली आहे. जाहीर निषेध! असे ट्विट कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्ला चढवला आहे.

  सचिन सावंत नेमकं काय म्हणाले?

  अनिल देशमुख आणि मविआ ला बदनाम करण्याचे मोदी सरकारचे षड्यंत्र उघड झाले आहे. प्राथमिक चौकशीत सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने असा निष्कर्ष काढला होता की परमबीर सिंह यांनी केलेल्या तथाकथित ₹१०० कोटी वसूली आरोपात अनिल देशमुख जी यांची कोणतीही भूमिका नाही आणि चौकशी बंद केली होती. असं सचिन सावंत म्हणाले.

  दरम्यान तपास अधिकाऱ्याच्या अहवालाला बाजूला सारून सीबीआयने भूमिका कोणाच्या इशाऱ्यावर बदलली हे शोधण्यासाठी या षडयंत्राची सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन चौकशी व्हावी. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशी करा असे सांगितले असताना न्यायालयाची दिशाभूल करून FIR नोंदवणे हा CBI चा मोठा गुन्हा आहे. असेही ते ट्विट करत म्हणाले आहेत.

  गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा

  गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे या यंत्रणा मोदी सरकारच्या विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी राजकीय शस्त्र कसे बनतात याचे हे स्पष्ट उदाहरण आहे. न्यायालयाची दिशाभूल केली जाते, नियम गुंडाळले जातात, चौकशा अंतहीन ठेवल्या जातात. अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. अशी षड्यंत्रे फक्त हुकुमशाहीत घडतात. लोकशाही वाचवण्यासाठी संपूर्ण देश एकत्र येण्याची वेळ आली आहे. जाहीर निषेध! असा मोदी सरकारवर ह्ल्ला करत सावंत यांनी निषेध नोंदविला आहे.