anil deshmukh

पोलिसांसाठी एक लाख घरे बांधण्याची योजना(1 lakh homes for police) लवकर पूर्ण करू, अशी घोषणा करीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारला शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली.

मुंबई : येत्या काळात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधण्याची योजना(one lakh homes to police) लवकरात लवकर पूर्ण करू, अशी घोषणा करीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख(home minister anil deshmukh) यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारला(one year of mahavikas aghadi) शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली. सोबतच दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आणणार असून येत्या अधिवेशनात त्याचा मसुदा मांडला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस दलात साडेबारा हजार जागा भरण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. पण मराठा आरक्षणामुळे भरती प्रक्रिया रखडली. मात्र कोणत्याही समाजावर अन्याय न करता पोलीस भरती प्रक्रिया राबवू. यासाठी पहिल्या टप्प्यात साडेपाच हजार पदांची भरती करत आहोत. त्यानंतर भरतीचा दुसरा टप्पा राबवू,असे ते म्हणाले.

विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पडणार आणि आमचे सरकार येणार, भाजपचे नेत्यांची ही वक्तव्ये म्हणजे मुंगेरीलालचे हसीन सपने आहेत. देवेंद्र फडणवीस मागील पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. यापुढील पाच वर्षेही मीच मुख्यमंत्री राहिन, असे त्यांनी म्हटले होते. पण महाविकास सरकार सत्तेत आले. पुढील पाच वर्षेही हे सत्तेच येण्याचे स्वप्न पाहत राहणार आहेत.
गंभीर गोष्टीसाठी नक्कीच राज्यपालांची भेट घ्यावी. मात्र विरोधक वारंवार लहानसहान गोष्टींसाठी राज्यपालांना जाऊन भेटतात. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करत आहेत. काहीच होत नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू आणता येईल का यासाठी विरोधक काम करत आहेत.

सुशांत सिंह प्रकरण आणि सीबीआय
सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. मात्र बिहारच्या निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी सीबीआयला आणले. सीबीआय तपास करत आहे. पण सुशांतने आत्महत्या केली की हत्या हे अजून त्यांनी स्पष्ट केलेले नाही. सीबीआय याबाबत शब्दही काढत नाही. यानंतर महाराष्ट्राने निर्णय घेतला की परवानगीशिवाय सीबीआयला तपास करता येणार नाही. अनेक राज्यांनी महाराष्ट्राचे अनुकरण केले, असेही गृहमंत्र्यांनी नमूद केले.

केंद्र सरकारचा यंत्रणांकडू दबाव ?
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला. यानंतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप दबाव टाकत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला. याबाबत गृहमंत्री म्हणाले की, प्रताप सरनाईक यांनी कायमच कंगना, अर्णब प्रकरणात आवाज उठवला. त्यामुळेच त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे.

नागपुरात सातत्याने खुनाच्या घटना घडत आहेत. स्वत: गृहमंत्री हे नागपूरचे आहेत. त्यामुळे नागपुरमधील गुन्हेगारी कमी कधी होणार असा प्रश्न विचारल असता ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ऑरेंज सिटी असलेली नागपूरची ओळख क्राईम सिटी म्हणून झाली. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर अनेक कुप्रसिद्ध गुंड जेलमध्ये आहे. अनेकांवर मोक्का लावला आहे.