महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन… चुकून पण असे काही मेसेज किंवा फोटो Forward करु नका नाही तर…

राज्यात पून्हा एकदा कोरोना रुग्णांची सख्या वाढली आहे. यामुळे सरकार कडक निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. अशातच महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याचे मेसेजस व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनबाबात खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

    मुंबई : राज्यात पून्हा एकदा कोरोना रुग्णांची सख्या वाढली आहे. यामुळे सरकार कडक निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. अशातच महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याचे मेसेजस व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनबाबात खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

    सोशल मिडीयावर खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई होणार आहे.

    लॉकडाऊनबाबत चुकीचे मेसेज, फोटो तयार करु सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची दखल घेतली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराच अनिल देशमुख यांनी दिला आहे.