गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी व्हायलाच हवी; वाझेंच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांची मागणी

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. आपल्या या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओदेखील जोडला आहे.

    मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी आता एनआयएने एपीआय सचिन वाझे यांना अटक केली आहे. तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर एनआयएने त्यांना अटक केली. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी व्हायलाच हवी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत केली आहे.

    महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. आपल्या या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओदेखील जोडला आहे.

    सचिन वाझेंची अटक झाली, पण त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनाही जाब तर द्यावाच लागणार आहे. शिवसेनेचे प्रवक्ता ‘ओसामा’ सचिन वाझेसाठी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय सांगणार आहेत? असा सवाल करत, अजून तर काय काय बाहेर येणार? तेही पाहायला हवे, असे किरीट सोमय्या यांनी ट्विट सोबत जोडलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.