गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी : राज ठाकरे

मनसेचे अध्यक्ष यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या प्रकरणात तात्काळ राजीनामा द्यावा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

    मुंबई : सचिन वाझे प्रकरणी आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविल्याने एकच गदारोळ झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. याचे महाराषट्राच्या राजकारणातही तीव्र पडसाद उमटले आहेत.
    मनसेचे अध्यक्ष यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली असून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी. अशी मागणीही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केली आहे.