गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील अचानक ‘वर्षा’वर ; राणेप्रकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा?

नारायणे राणे यांना अटक झाल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अटक केल्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होण्यास सुरूवात झाली. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची आज पत्रकार परिषद होती. परंतु ऐनवेळी ती सुद्धा रद्द करण्यात आली आहे. 

    मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राणे प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी धाव घेतली. तसेच युवा सेनेचे पदाधिकारी देखील वर्षावर आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

    नारायणे राणे यांना अटक झाल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अटक केल्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होण्यास सुरूवात झाली. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची आज पत्रकार परिषद होती. परंतु ऐनवेळी ती सुद्धा रद्द करण्यात आली आहे.

    दरम्यान, दिलीप वळसे-पाटील अचानक वर्षावर पोहोचले असून राणेप्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या चर्चेनंतर या प्रकरणासंबंधित ठाकरे सरकार आणि उच्च न्यायालय काय निर्णय घेणार? हे पाहणं आता सर्वांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.