पार्थ पवारांनी केलेली सीबीआय चौकशीची मागणी गृहराज्यमंत्र्यांनी फेटाळली

  • मुख्यमंत्री यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही मागणी केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात धूसपूस झाल्याचे दिसत आहे. मात्र अनिल देशमुख यांनी पार्थ पवारांची मागणी फेटाळून लावली आहे.

मुंबई – सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतच आहे. सुशांतच्या चाहत्यांनी आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीचा तगादा लावला आहे. सुशांतसिंगच्या वडिलांनी पटना पोलीसांकडे एफआयआर दाखल केल्यापासून पटना पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस यांच्यातील संघर्षाचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच या प्रकरणाला राजकारणी रंग लागताना दिसत आहे. मुख्यमंत्री यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही मागणी केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात धूसपूस झाल्याचे दिसत आहे. मात्र अनिल देशमुख यांनी पार्थ पवारांची मागणी फेटाळून लावली आहे. सुशांत सिंग राजपूतप्रकरणी तपास करण्यासाठी मुंबई पोलीस सक्षम असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. 

उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी २७ जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी अनिल देशमुख यांना पत्र देत सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. यामुळे राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे. राजकारणात नाराजीचा सुर उमटला आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस तपास करत असताना पार्थ पवार यांनी पत्राद्वारे सीबीआय चौकशीची मागणी केल्याने शिवसेनेत नाराजी उमटली आहे. या प्रकरणाविषयी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शरद पवारांकडे आपली नाराजी व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. 

पार्थ पवारांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असली तरी, त्यांचे बंधु रोहित पवार यांनी मात्र विरोधी भूमिका घेतली आहे. रोहित पवार यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस सक्षम आहे. अशा शब्दांत मत व्यक्त केले आहे.