होमियोपॅथीमुळे मिळतोय कोव्हीड १९ च्या रुग्णांना  दिलासा

मुंबई : कोव्हीड १९ वर लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असताना भारताने कोव्हीड १९ वर होमिओपॅथी उपचार पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील सेव्हन हिल या पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांवर करण्यात आलेल्या रुग्नांपैकी २४ रुग्णावर होमिओपॅथी पद्धतीने केलेला उपचार गुणकारी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 पालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपचारांना प्रतिसाद

 
मुंबई :  कोव्हीड १९ वर लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असताना भारताने कोव्हीड १९ वर होमिओपॅथी उपचार पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील सेव्हन हिल या पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांवर करण्यात आलेल्या रुग्नांपैकी २४ रुग्णावर होमिओपॅथी पद्धतीने केलेला  उपचार गुणकारी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अधिक रुग्ण्यावर उपचार करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करणारे पत्र पालिकेकडून सेंट्रल कौन्सिल ऑफ होमियोपॅथी या परिषदेला पाठवले आहे. 
 
ऍलोपथीमधील हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध कोरोनावर गुणकारी ठरत असल्याचा दावा केला जात असताना आता होमियोपॅथीच्या ‘झिंकम म्युरिअटिकम २०० सी’ ह्या गोळ्या कोव्हीड १९ बधितांसाठी गुणकारी ठरत असल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे. ‘झिंकम म्युरिअटिकम २०० सी’ च्या गोळ्या दिवसातून चार वेळा दिल्यास अन्य उपचार पद्धतीच्या तुलनेत रुग्ण लवकर बरा होत असल्याचे निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. पालिकेच्या सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपासून २४ रुग्णांवर होमिओपॅथी उपचार करण्यास सुरुवात केली होती. त्याला या रुग्णांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे होमिओपॅथीच्या गोळ्यांचा दुष्परिणामही नसल्याने सर्वच रुग्ण या गोळ्या घेऊ शकतात. होमिओपॅथीची उपचार पद्धती गुणकारी ठरत असल्याने सेव्हन हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी अधिक रुग्नावर उपचार करण्यासंदर्भात सेंट्रल कौन्सिल ऑफ होमियोपॅथीला पत्र लिहिले आहे. ह्या पत्रात त्यांनी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर करण्यासाठी परवानगी मागितली आहे.