घर मालकांनी भाडेकरूंना घरभाड्याचा तगादा लावू नका : राज्य सरकारची सूचना

मुंबई: लॉकडाऊनच्या या काळात सरकारचा भाडे तत्वावर राहणाऱ्यांना थोडा दिलासा भेटला आहे. लॉक डाऊन मुळे अनेक उद्योग धंदे बंद असल्याने त्यांच्याकडे वापरासाठी मुबलक पैसे नाहीत.

मुंबई: लॉकडाऊनच्या या काळात सरकारचा भाडे तत्वावर राहणाऱ्यांना थोडा दिलासा भेटला आहे. लॉक डाऊन मुळे अनेक उद्योग धंदे बंद असल्याने त्यांच्याकडे वापरासाठी मुबलक पैसे नाहीत. त्यामुळे भाड्याने रहात असलेल्या अनेकांना घरभाडे देणे अशक्य होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही भाडेकरूच्या पाठी घरभाड्यासाठी घरमालकांनी तगादा लावू नये असे आवाहन राज्य सरकारने केले असून घरभाडे वसूली तीन महिने पुढे ढकलावी अशी सूचनाही केली.

लॉक़डाऊनमुळे सर्वच संस्था, बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने यासह सर्वच गोष्टी बंद आहेत. त्यामुळे रोजगारावर परिणाम झालेला आहे. तर अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे. त्यामुळे घरमालकांनी या काळात त्यांच्यामागे घरभाड्यासाठी तगादा लावू नये असे आवाहन करत किमान तीन महिने घरभाडे वसूली पुढे ढकलावी असे आवाहन घरमालकांना करण्यात आले आहे. तसेच घरभाडे थकले म्हणून कोणाला घरातून बाहेरही काढू नये अशी सूचनाही करण्यात आली असून गृहनिर्माण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांनी यासंदर्भात पत्रकही जारी केले आहे.