भाजपात येणाऱ्यांचा सन्मान ! राणेंना केंद्रीय मंत्रिपद देऊन भाजपाचा मेसेज…

सध्याच्या राज्याच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघआडीला थेट अंगावर घेऊ शकणारे नेतृत्व अशीही राणेंची ओळख आहे. त्यातही शिवसेनेविषयी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील त्यांची वक्तव्ये, आक्रमक टीका ही नेहमीच चर्चेचा विषय ठरलेली आहे. अशा स्थितीत शिवसेनेच्या प्रतिमाभंजनासाठी राणेंना बळ देण्याचा प्रयत्न भाजपाने केले असल्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.

  मुंबई : केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना संधी दिल्याने, राज्याच्या राजकारणात मोठा फरक पडण्याची चिन्हे आहेत. राणे यांना मंत्रिपद देऊन भाजपाने एकचा दगडात अनेक पक्षी मारले आहेत. त्यात शिवसेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर देणारे नेतृत्व, मराठा आरक्षणासाठी भाजपाचा नवा आक्रमक चेहरा याचबरोबर राज्यात विधानसभा निवडणुकांपूर्वी आलेल्या आयाराम आणि इच्छुकांनाही चुचकारण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.

  २०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेशासाठी रांग लावली होती. त्यात तत्कालीन काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते राधाकृण विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक, राष्ट्रवादीचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजीतसिंह, सोलापुरातील विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यासारखअया अनेक मात्तबर घराण्यांचा समावेश होता.

  भाजपाला बहुमत मिळूनही सत्ता न मिळ्याने, यातील अनेक जण गेल्या दोन तीन वर्षांपासून धास्तावलेले आहेत. येणाऱ्या काळात राजकीय भवितव्याची चिंताही त्यांना भेडसावू लागली आहे. अशा स्थितीत भाजपात येणाऱ्यांचा उचित सन्मान करण्यात येतो आहे, असा संदेश भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी राणेंना केंद्रीय मंत्रिपद दून केला आहे.

  सध्याच्या राज्याच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघआडीला थेट अंगावर घेऊ शकणारे नेतृत्व अशीही राणेंची ओळख आहे. त्यातही शिवसेनेविषयी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील त्यांची वक्तव्ये, आक्रमक टीका ही नेहमीच चर्चेचा विषय ठरलेली आहे. अशा स्थितीत शिवसेनेच्या प्रतिमाभंजनासाठी राणेंना बळ देण्याचा प्रयत्न भाजपाने केले असल्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.

  राज्यात लवकरच शिवसेना-भाजपा सरकार एकत्र सत्ता स्थापन करेल, या चर्चांनाही राणेंच्या केंद्रीय मंत्रिपदातील वर्णीमुळे योग्य उत्तर मिळाले आहे. येत्या मंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडविण्याचे भाजपाचे स्वप्न असेल. कसेही करुन शिवसेनेची आर्थिक नाडी असलेल्या मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावून, शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपाचा डाव आहे, यात राणे यांची त्यांना नक्कीच मदत होण्याची शक्यता आहे.

  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात सध्या सुरु असलेल्या आंदोलनात राणे हे मराठा चेहरा म्हणून भाजपाचे नेतृत्व ठरु शकण्याचीही शक्यता आहे. राणे पिता पुत्र सातत्याने या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा स्थितीत केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारणाऱ्या संभाजीराजेंनाही प्रत्युपत्तर देण्याची राणेंची भूमिका आहे.