हुक्का पार्लरवर छापा, व्यवस्थापकासह ९७ जणांवर गुन्हे दाखल

जोगेश्वरीतील बॉंम्बे ब्रुट हुक्का पार्लर आतून सुरु होता. या पबमध्ये हुक्का पार्टी सुरु होती. तसेच मोठ्या प्रमाणात तरुण मुलं आणि मुली सहभागी होते. पोलीसांनी रविवारी पहाटे तीनच्या सुमारास या हुक्का पार्टीवर छापा टाकला होता. ओशिवारा पोलीसांना या पब मध्ये मोठ्या प्रमाणात तरुण आणि तरुणी जमल्याची खबर मिळाली होती. त्यामुळे ओशिवारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगल यांनी पोलीस पथकासह ही कारवाई केली आहे.

मुंबई : जोगेश्वरीमध्ये मुंबई पोलीसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. आतून सुरु असलेल्या हुक्का पार्टीवर छापा टाकून पोलीसांनी ९७ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हुक्का पार्टीत तरुण युवा आणि यावतींचा तसेच तृतीय पंथीयांचा समावेश होता. 

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार. जोगेश्वरीतील बॉंम्बे ब्रुट हुक्का पार्लर आतून सुरु होता. या पबमध्ये हुक्का पार्टी सुरु होती. तसेच मोठ्या प्रमाणात तरुण मुलं आणि मुली सहभागी होते. पोलीसांनी रविवारी पहाटे तीनच्या सुमारास या हुक्का पार्टीवर छापा टाकला होता. ओशिवारा पोलीसांना या पब मध्ये मोठ्या प्रमाणात तरुण आणि तरुणी जमल्याची खबर मिळाली होती. त्यामुळे ओशिवारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगल यांनी पोलीस पथकासह ही कारवाई केली आहे. 

पोलीसांनी हुक्का पार्टीवर छापा टाकत ६५ ग्राहक आणि व्यवस्थापकसह ३२ कर्मचाऱ्यांना असे एकूण ९७ जणांना अटक केली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणी आणि तृतीयपंथी होते. अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन जामिनावर सोडण्यात आले असल्याचे सांगितले आहे. याच हुक्का पार्लरवर लॉकडाऊन काळातही पोलीसांनी ४ ते पाच वेळा कारवाई केल्याचे देखील यावेळी पोलीसांनी सांगितले आहे.