मुंबईत घडली दिल्लीसारखी भयानक घटना; तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी सळई घुसवली

पुण्यात आठवड्याभरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्कारासारख्या हादरवणाऱ्या तीन घटना घडल्या आहेत. आता राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही अशाप्ररकारची घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. मुंबईच्या साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात गुरुवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

    मुंबई : दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणासारखी भयानक घटना मुंबईत घडली आहे. एका 32 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचे संतापजनक आणि अमानुष कृत्य नराधमांनी केले आहे. पीडीत तरुणी गंभीर जखमी आहे.

    पुण्यात आठवड्याभरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्कारासारख्या हादरवणाऱ्या तीन घटना घडल्या आहेत. आता राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही अशाप्ररकारची घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. मुंबईच्या साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात गुरुवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

    साकीनाका खैरानी रोड येथे काल रात्री तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांना एक महिला जखमी अवस्थेत सापडली. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी ती गंभीररीत्या जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.