sanjay nirupam

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर मुंबईचे माजी विभागीय अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम यांनी मोफत लसीकरणाच्या मुद्यावर फटकारले आहे. ‘अभी जरा बाज आए’ असा इशारा त्यांनी ट्विट करुन दिला आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीने एकट्यानेच मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करणे कितपत योग्य आहे, असा सवालही उपस्थित केला आहे.

    मुंबई : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर मुंबईचे माजी विभागीय अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम यांनी मोफत लसीकरणाच्या मुद्यावर फटकारले आहे. ‘अभी जरा बाज आए’ असा इशारा त्यांनी ट्विट करुन दिला आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीने एकट्यानेच मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करणे कितपत योग्य आहे, असा सवालही उपस्थित केला आहे.

    महामारीत श्रेय घेण्याचे राजकारण नको

    संजय निरुपम यांनी व्टिट करून राष्ट्रवादीच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे आणि मोफत लसीकरण करण्याची घोषणा एकट्या राष्ट्रवादीकडून केली जात आहे. मोफत लसीकरणाचा निर्णय योग्य आहे. पण त्याची घोषणा सरकार करणार की केवळ एक मित्र पक्ष करणार? भीषण महामारीत श्रेय घेण्याचे राजकारण अत्यंत वाईट आहे. राष्ट्रवादीने असे प्रकार करू नयेत, अभी ज़रा बाज़ आएँ।, अशी टीका निरुपम यांनी केली आहे.

    जनतेच्या हिताचा निर्णय मागे घेऊ नये दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीवर चारही बाजूने तोंडसुख घेण्याची संधी न दवडणा-या भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यानीही मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.