chandrakant-dada-patil

राज्यात जनता वाढत्या वीज बिलामुळे त्रस्त आहे, शेतकरी त्रस्त आहेत, लोकं आत्महत्या करत आहे. मात्र ऊर्जामंत्री उत्तर प्रदेशात कसे? असा सवाल करत पाटील यांनी टीका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलं आहे.

 मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये दलित सरपंचाची आझमगढ येथे हत्या करण्यात आल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. या घटनेनंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत काल शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांना सीमेवरच ताब्यात घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांच्यावर टीका केली होती. राज्यात जनता वाढत्या वीज बिलामुळे त्रस्त आहे, शेतकरी त्रस्त आहेत, लोकं आत्महत्या करत आहे. मात्र ऊर्जामंत्री उत्तर प्रदेशात कसे? असा सवाल करत पाटील यांनी टीका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिलं आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ वर्षात अर्धा काळ प्रचार मंत्री म्हणून देशातील प्रत्येक राज्यात प्रचार करत होते आणि त्याच वेळी देश आर्थिक डबघाईस जात होता. देशाला नोटबंदीच्या संकटात टाकून १२५ कोटी लोक रांगेमध्ये असताना विदेश दौऱ्याला गेले. ट्रम्पला नमस्ते करण्यासाठी व मध्य प्रदेशचे काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी लॉकडाउनची घोषणा पुढे ढकलून देशाला करोनाच्या संकटात ढकलले. आणि तुम्ही नितीन राऊत यांच्या उत्तर प्रदेश यात्रेला आक्षेप घेता हे आश्चर्य आहे! अशा प्रकारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

पुढे म्हणाले की, गेल्या सहा वर्षांत देशात दलिंतांवर हल्ले वाढले. दलित समाजाचे देशात आंदोलन झाले. पण मिलिंद एकबोटे आणि मनोहर पाठीशी घालणाऱ्या तुम्हाला आता दलित समाज आठवला? आश्चर्य आहे!, असे सचिन सावंत म्हणाले.