कॅबिनेट मंत्र्याविरुद्ध स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी कशी काय होऊ शकते?, नितेश राणेंचा सवाल

'कॅबिनेट मंत्र्याविरुद्ध स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी कशी काय होऊ शकते? अनिल परब यांच्यासाठी वेगळा नियम का का?. जर, संजय राठोड राजीनामा देत असतील तर मग निळ्या डोळ्यांच्या मुलासाठी मातोश्रीची सहानुभूती का?, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे. तसेच, याप्रकरणी सीबीआय चौकशीच न्याय मिळवून देईल, त्यापेक्षा काही कमी नाही', असे म्हणत सीबीआय चौकशीची मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.

    आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो असा आरोप गजेंद्र पाटील यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने 300 कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचेही तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकावर पुन्हा आरोपांचे शिंतोडे उडविण्यात येत आहेत. त्यातच, भाजपा नेते आक्रमक होताना दिसत आहेत. आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन अनिल परब यांना लक्ष्य केलंय.

    ‘कॅबिनेट मंत्र्याविरुद्ध स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी कशी काय होऊ शकते? अनिल परब यांच्यासाठी वेगळा नियम का का?. जर, संजय राठोड राजीनामा देत असतील तर मग निळ्या डोळ्यांच्या मुलासाठी मातोश्रीची सहानुभूती का?, असा प्रश्न नितेश राणे यांनी विचारला आहे. तसेच, याप्रकरणी सीबीआय चौकशीच न्याय मिळवून देईल, त्यापेक्षा काही कमी नाही’, असे म्हणत सीबीआय चौकशीची मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.