
सगळ्या मंत्र्यांना अचानक एकत्र कोरोना झाला कसा? असा सवाल उपस्थित करत मनसेने ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी काही प्रश्न उपस्थित करत ठाकरे सकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
मुंबई : सगळ्या मंत्र्यांना अचानक एकत्र कोरोना झाला कसा? असा सवाल उपस्थित करत मनसेने ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केलेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी काही प्रश्न उपस्थित करत ठाकरे सकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
“सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी, पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
सावधान सध्या करोना चा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन करोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो.टीप-ह्या नंतर अनेक मा वि आ समर्थक मला ट्रोल करतील पण जे सत्य आहे ते बोलणारच
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 22, 2021
सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात असल्याचा आरोप देशपांडे यांनी केलाय. अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे. मुख्यमंत्री साहेबाना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढवून तर सांगीतले जात नाहीत ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील ३३ कॅबिनेट मंत्र्यांपैकी आतापर्यंत १७ जणांना कोरानाची लागण झालीय. तर १० राज्यमंत्र्यांपैकी ६ जणांना कोरोना होऊन गेला आहे. त्यामुळे एकूण ४३ पैकी २३ मंत्री कोरोनाबाधित आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्नपुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आता छगन भुजबळांना कोरोनाची लागण झाली आहे.