How did he get the CDR report that even put the police to sleep? Devendra Fadnavis answered directly in the House

जबानीचे कागदही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याआधी फडणवीसांच्या हाती लागल्याची एकच चर्चा सुरू होती. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रान्चचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन अलंकुरे यांच्याकडे होता. फडणवीस यांनी वाझे आणि स्कॉर्पिओ गाडीचा दावेकरी मनसुख हिरेन यांच्यातील जो सीडीआर रिपोर्ट सभागृहात ऐकवला. तो त्यांच्याकडे आला कुठून, या प्रश्नाने सार्‍या पोलीस दलाची झोप उडवली. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सीडीआर रिपोर्ट आलाच कसा? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चौकशीची मागणी केली.

    मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. ही कार तिथे कोणी ठेवली होती, हे कोडे अद्याप उलगडलेले नसतानाच, शुक्रवारी त्या कारचे मालक मनुसख हिरेन यांची मृतदेह मुंब्रा खाडीत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. असे असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काही कागदपत्रे सादर केल्याने पोलिसांचीही झोप उडाली.

    जबानीचे कागदही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याआधी फडणवीसांच्या हाती लागल्याची एकच चर्चा सुरू होती. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रान्चचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन अलंकुरे यांच्याकडे होता. फडणवीस यांनी वाझे आणि स्कॉर्पिओ गाडीचा दावेकरी मनसुख हिरेन यांच्यातील जो सीडीआर रिपोर्ट सभागृहात ऐकवला. तो त्यांच्याकडे आला कुठून, या प्रश्नाने सार्‍या पोलीस दलाची झोप उडवली. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सीडीआर रिपोर्ट आलाच कसा? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चौकशीची मागणी केली.

    फडणवीस यांनी हा रिपोर्ट कसा मिळाला याचा खुलासा विधानसभेत केला. मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा काही अडचण नाही. पण, खुनी शोधला नाहीत. त्याच्या पलिकडची माहिती माझ्याकडे आहे असा दावा फडणवीस यांनी केला. माहिती मिळवण्याचा माझा अधिकार आहे. माझी चौकशी करा, पण तुम्ही खुनी लोकांना का सोडताय? असा प्रश्न उपस्थित करताना देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले.

    खुनी है… खुनी है… घोषणेने सभागृहात गोंधळ

    पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सभागृहात केला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी डेलकरांच्या आतमहत्येचा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान, ‘अमित शहा खुनी है’ च्या घोषणा देण्यात आल्याने वातावरण आणखी तापले. यानंतर गृहमंत्री अनिल देखमुख डेलकर आत्महत्येविषयी बोलत असताना विरोधकांनी सरकार खुनी है… खुनी है… अशा घोषणा दिल्या.