समुद्राच्या किनाऱ्यावर कचरा येतोच कसा? प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या

त्यासंदर्भात अनेक वृत्तपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्याची गंभीर दखल घेत मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांनी स्वतःहून याचिका (सू-मोटो) दाखल करून राज्य सरकराला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर मुंबईला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यावर कचरा जमा होतो कसा? हा एक गंभीर मुद्दा आहे.

  • सोमवारी भूमिका मांडण्याचे न्यायालयाचे राज्य सरकाराला निर्देश

मुंबई : राज्यासह मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकलेल्या ‘तोक्ते’ चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता. तसे असले तरी इतरही वेळेस मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा येतोच कसा? असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकराला जाब विचारला तसेच सदर प्रश्न गांभीर्याने घेण्याचा सल्ला देत त्यावर उपाययोजना करण्याचेही निर्देश दिले.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मे महिन्याच्या १७ आणि १८ तारखेला राज्यासह मुंबईच्या किनारपट्टीला ‘तोक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. त्यात कोकण, अलिबाग, रायगड, मुंबई किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या, अनेकांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले होते. त्यातच या वादळासोबत राज्यासह मुंबईच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला आहे.

त्यासंदर्भात अनेक वृत्तपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्याची गंभीर दखल घेत मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांनी स्वतःहून याचिका (सू-मोटो) दाखल करून राज्य सरकराला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर मुंबईला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यावर कचरा जमा होतो कसा? हा एक गंभीर मुद्दा आहे.

मुंबईतील मिठी नदीच्या पात्रात ठिकठिकाणी लोकांनी अनधिकृतपणे घरे, वस्त्या उभारल्या आहेत. त्या घरातील कचरा नदीत फेकला जातो नदीतून तो कचरा समुद्रात जातो आणि समुद्रातील भरती ओसरली की सगळा कचरा किनाऱ्यावर जमा होतो. दरवर्षी असेच सुरू आहे. समुद्र किनारे दूषित असल्यामुळे समुद्रातील जैवविविधतेची हानी होत आहे, त्यामुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका, त्यासाठी काही ठोस उपाययोजना करायला हव्यात, असे खंडपीठाने राज्य सरकारला सुनावले.

तेव्हा, मुंबईला एकूण सात समुद्र किनारे लाभले असून त्यातील प्रत्येक किनारा हा वेळोवेळी स्वच्छ करण्यात येतो, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडताना खंडपीठाला दिली. त्याची दखल घेत सोमवारी सविस्तर युक्तिवाद करण्याचे तोंडी निर्देश राज्य सरकारला देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.

How does garbage come to the beach Take the question seriously