no instructions give notice sharad pawar election commission clears

मुंबई : महाविकास आघाडी सरकार किती वर्ष चालणार? असा प्रश्न उपस्थित करत विरोधक सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. राज्यात हा महाविकास आघाडीचा प्रयोग करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनीच या प्रश्नाच उत्तर दिले आहे.  यावेळी त्यांनी सत्ता स्थापन करण्याची वक्तव्ये करणाऱ्या भाजप नेत्यांनाही टोला लगावला आहे.  महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

महाराष्ट्रात झालेला हा पहिलावहिला प्रयोग आहे. पाच वर्षे सरकार चालेल एवढा कद्रूपणा का करायचा? पुढची अनेक वर्षे हे सरकार चालेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. भाजपाची हातातली सत्ता गेल्याने ते अस्वस्थ झाले असा टोलाही पवारांनी लगावला.

विविध प्रयोग करुन झालेलं सरकार हे महाराष्ट्राने तीनवेळा पाहिली. सर्वात पहिली जबाबदारी माझ्यावर होती. १९७८ मध्ये झालेला तो प्रयोग हा तसा सोपा राजकीय प्रयोग होता. कारण त्यातले मोजके लोक होते की ज्यांना प्रशासनाचा अनुभव होता. त्यामुळे राज्याच्या प्रमुखांकडून त्यांच्या फार अपेक्षा नव्हत्या. ते अत्यंत संतुष्ट असायचे, त्यामुळे ते राज्य चालवणं तितकंसं कठीण नव्हतं. नंतरच्या काळात आणखी एक सरकार येऊन गेलं. मात्र, त्या सरकारच्या मागे बाळासाहेब ठाकरेंसारखं खंबीर नेतृत्त्व ठामपणे उभं होतं म्हणून ते सरकार चाललं. त्यांनी मार्गदर्शक म्हणून उत्तम काम केलं त्यामुळे त्या सरकारलाही कोणतीही अडचण आली नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या सरकारने उत्तम काम केलं आहे. करोनाच्या काळातही त्यांनी महाराष्ट्र खूप चांगल्या पद्धतीने सांभाळला. आता वर्षपूर्तीनंतर चिकित्सा जास्त केली जाते आहे. मुख्यमंत्र्यांना प्रशासनाचा अनुभव नसताना ते चांगल काम करत असल्याची स्तुतीसुमने पवारांनी उधळली.