How to make an allegation when there is no strong evidence? Argument in the High Court on behalf of Arnab also named Waze in the TRP scam

सुनावणीदरम्यान, अँड. अशोक मुदरगी यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि निलंबित करण्यात आलेले सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले. वाझे यांना या प्रकरणाची जून २०२० पासून माहिती होती. मात्र, त्यांनी पुढचे काही महिने काहीच केले नाही?, असा सवाल करत टीआरपी घोटाळ्याचे तपास अधिकारी वाझे यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केला.

  मुंबई : कथित टीआरपी घोटाळा प्रकरण हे निव्वळ अर्णब गोस्वामी यांना गोवण्यासाठीच रचण्यात आले आहे. असा दावा मंगळवारी रिपब्लिक वृत्त वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. त्यासोबतच कुठलेही सबळ पुरावे नसतानाही एखाद्या कंपनीविरोधात घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप कसा करण्यात येऊ शकतो? असा सवालही यावेळी अर्णबने उपस्थित केला.

  कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा यासाठी अर्णबसह एआरजी आऊटलेअर समुहाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासोबतच पोलिसांच्या तपासाला आव्हान देत तपास सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेकडे चौकशीसाठी देण्याची मागणी करणारी याचिकाही एआरजी मीडियाने दाखल केली आहे. त्या याचिकेवर याआधी व्हिसीमार्फत सुनावणी सुरू होती.

  मात्र, मंगळवारी पहिल्यांदाच प्रत्यक्षात न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. टीआरपी घोटाळा हा अर्णबला गोवण्यासाठी रचलेले एक षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी त्यांच्यावतीने युक्तिवाद करताना अँड. अशोक मुदरगी यांनी केला. तसेच एखाद्या कंपनीवर घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप कसा होऊ शकतो? असा सवाल उपस्थित करत कुठलेही सबळ पुरावे नाहीत म्हणूनच एआरजी मीडियाच्या पदाधिकाऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आलेले नाही.

  आपल्या सोयीनुसार चौकशीला बोलावून फक्त छळ करण्यासाठी हा घाट घातल्याचा आरोपही अँड. अशोक मुदरगी यांनी केला. तसेच पालघरमधील साधूंची झालेली हत्या, कंगाना रणौत प्रकरण, अन्वय नाईक आत्महत्या या मुद्यांवर राज्य सरकारवर सडकून टीका केल्यामुळेच अर्णब यांच्याविरोधात हा सारा बनाव रचल्याच्या आरोपही अँड. अशोक मुदरगी यांनी केला. मात्र, वेळेअभावी न्यायालयाने सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली आणि तोपर्यंत अर्णब आणि एआरजी मीडियाच्या इतर कर्मचाऱ्यांना अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण खंडपीठाने कायम ठेवले.

  वझे आणि पोलीस आयुक्तांच्या भूमिकेवर सवाल

  सुनावणीदरम्यान, अँड. अशोक मुदरगी यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि निलंबित करण्यात आलेले सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले. वाझे यांना या प्रकरणाची जून २०२० पासून माहिती होती. मात्र, त्यांनी पुढचे काही महिने काहीच केले नाही?, असा सवाल करत टीआरपी घोटाळ्याचे तपास अधिकारी वाझे यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केला.

  मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह या प्रकरणी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही काही संशयास्पद विधाने केली होती. याप्रकरणी तक्रार कशी आली हे स्पष्टपणे सांगण्यात आले नव्हते. दुसरीकडे, बार्ककडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालात याचा कुठेही उल्लेख केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेणे चुकीच असल्याचे म्हणत यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित करण्यात आला.