याला सापडलाय तिची बोलती बंद करणारा रिमोट; ऑपरेट करताच तिची बडबडच होते बंद

एका व्यक्तीला एक विचित्र रिमोट सापडला आहे. हा रिमोट अगदी टीव्ही, एसीप्रमाणे त्याच्या पत्नीलाही कंट्रोल करत आहे. ट्विटवर हा मजेशीर व्हिडिओ (Funny Video) व्हायरल होत आहे.

    मुंबई : बायकोची (Wife) बडबड… ही समस्या बहुतेक पुरुषांची आहे. तिची बडबड थांबवण्याचा काही मार्ग आहे का? याचा विचार कितीतरी पुरुष (Husband) करतात. तुमचंही लग्न झालं असेल आणि इतर नवऱ्यांप्रमाणे तुमचीही अशीच व्यथा असेल तर बायकोला कंट्रोल करणारा एखादा रिमोट (Wife silence remote) असता तर किती बरं झालं असतं, असं एकदा तरी तुमच्या मनात नक्कीच आलं असेल. एका व्यक्तीच्या हाती असा रिमोट (Weird Remote) लागला आहे. ज्याचा व्हिडिओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल होतो आहे.

    एका व्यक्तीला एक विचित्र रिमोट सापडला आहे. हा रिमोट अगदी टीव्ही, एसीप्रमाणे त्याच्या पत्नीलाही कंट्रोल करत आहे. ट्विटवर हा मजेशीर व्हिडिओ (Funny Video) व्हायरल होत आहे.

    व्हिडिओत पाहू शकता, एक व्यक्ती सोफ्यावर शांत बसली आहे. आणि त्याची पत्नी फक्त बडबड बडबड करते आहे. त्या व्यक्तीच्या हातात एक रिमोट आहे. त्या रिमोटचं एक बटण दाबतो आणि मग काय जादूच होते.

    त्याच्या पत्नीचा आवाज म्युट होतो. म्हणजे ती बडबडते तर आहे पण त्या व्यक्तीला ऐकू येत नाही. मग ही व्यक्ती एक-एक करत रिमोटच्या सर्व बटणांचा बायकोवर प्रयोग करून पाहतो. रिमोटमार्फत तो आपल्या बायकोचा म्युटच नाही तर रिवाइंड आणि फॉरवर्ड आणि पॉझही करतो आणि शेवटी तो स्विच ऑफ बटण दाबतो आणि त्याची बायको गायबच होते.

    आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अशा रिमोटची मागणी करत आहेत. तुम्हालाही असाच रिमोट हवा असेल हो की नाही. हा रिमोट कुठे मिळेल, असं तुम्ही विचाराल.

    पण बायकोला अशा पद्धतीने कंट्रोल करणारा रिमोट आतापर्यंत तरी तयार झालेला नाही. हा व्हिडिओ मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला गप्पपणे बायकोची बडबड ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय सध्या तरी नाही.

    how to silent wife husband found remote control funny video viral