काम थांबलेल्या मुंबईच्या  डबेवाल्यांच्या मदतीला धावली HSBC Bank बँक केली इतक्या लाखांची मदत

डबेवाले हे मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात दररोज २ लाख ग्राहकांना डबे पुरवण्याचे काम करत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे डबेवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

    मुंबई: कोरोनाच्या महामारीचा मोठा फटका उद्योग व्यवसायांना बसला आहे. व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मुंबईमधील डबेवाल्यांनाही कोरोनाचा मोठा फटाका बसला आहे. मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याने डबेवाल्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. अशा परिस्थितीत एचएसबीसी (HSBC Bank) ही विदेशी बँक डबेवाल्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे.

    HSBC बँकेने डबेवाल्यांच्या मदतीसाठी १५कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. यामुळे डबेवाल्यांना विमा, रेशन, नव्या सायकली आणि कुटुंबांसाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. सध्या मुंबईतील बहुतांश कार्यालये ही बंद आहेत किंवा मोजक्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु आहेत. त्यामुळे ऑफिसमधील लोकांना डबे पोहोचवण्याचा व्यवसाय ठप्प झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर अनेकदा डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे प्रचंड कौतुक झाले आहे. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊनने डबेवाल्यांची अवस्था बिकट करुन टाकली आहे.