hsc exam english subject only one question paper for all
यंदापासून बारावीसाठी इंग्रजीची एकच प्रश्नपत्रिका, बहुसंच प्रश्नपत्रिका पद्धत बंद

यंदाच्या बारावीच्या (HSC) परीक्षेपासून इंग्रजी विषयासाठी (English subject) बहुसंच प्रश्नपत्रिका (multiple question papers set) पद्धत बंद होणार असून सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्नपत्रिका (one question paper) तयार करण्यात येणार आहे. या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कृतिपत्रिकेप्रमाणेच असणार आहे.

  • शिक्षकांचे श्रम वाचणार

मुंबई : यंदाच्या बारावीच्या परीक्षेपासून इंग्रजी विषयासाठी बहुसंच प्रश्नपत्रिका पद्धत बंद होणार असून सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार आहे. या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कृतिपत्रिकेप्रमाणेच असणार आहे.

वर्ष २०२०-२१ म्हणजेच यंदापासून बारावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये बारावीची पहिलीच परीक्षा पार पडणार आहे. या नव्या अभ्यासक्रमात ऑक्टोबर २००४ च्या परीक्षेपासून इंग्रजी विषयाच्या परीक्षेसाठी सुरू करण्यात आलेली बहुसंची प्रश्नपत्रिका (A,B,C,D) पद्धत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बंद केली आहे. नव्या अभ्यासक्रमाची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसाठी यापुढे एकच प्रश्नपत्रिका छापण्यात येणार आहे.

रिपीटर्ससाठी मात्र जुनाच पर्याय

जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांना मात्र बहुसंची प्रश्नपत्रिका संच देण्यात येणार आहे. हा पर्याय त्यांना फेब्रुवारी २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठीच मिळणार आहे.