हम नही सुधरेंगे ! दादरच्या भाजी बाजारात नागरिकांची तुडुंब गर्दी, कोरोना निकषांची ऐशीतैशी

गुरुवारी मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळूनदेखील मुंबईकर काळजी घेताना दिसत नाहीत. उलट जागोजागी गर्दी करण्यातच ते धन्यता मानत असल्याचं चित्र आहे. दादरच्या भाजी बाजारातलं आज (शुक्रवार) सकाळचं चित्र धक्कादायक होतं. हजारो मुंबईकरांनी दादरच्या भाजी बाजारात गर्दी केल्याचं दिसलं. सोशल डिस्टन्सिंंगचे कुठलेही निकष न पाळता दाटीवाटीनं मुंबईकर भाजी खरेदी करताना दिसत होते. 

    महाराष्ट्रात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून काल (गुरुवारी) दिवसभरात सापडलेल्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येनं सर्व उच्चांक मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला. कोरोनाचं आगमन झाल्यापासून गुरुवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. राज्यातील परिस्थिती चिंताजनक असून सरकारकडून प्रतिबंधात्मक उपायही केले जात आहेत. मात्र मुंबईकरांना त्याचं काहीच गांभिर्य नसल्याचं चित्र आहे.

    गुरुवारी मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळूनदेखील मुंबईकर काळजी घेताना दिसत नाहीत. उलट जागोजागी गर्दी करण्यातच ते धन्यता मानत असल्याचं चित्र आहे. दादरच्या भाजी बाजारातलं आज (शुक्रवार) सकाळचं चित्र धक्कादायक होतं. हजारो मुंबईकरांनी दादरच्या भाजी बाजारात गर्दी केल्याचं दिसलं. सोशल डिस्टन्सिंंगचे कुठलेही निकष न पाळता दाटीवाटीनं मुंबईकर भाजी खरेदी करताना दिसत होते.

    गुरुवारी राज्याने दैनंदिन कोरोना रुग्णांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये सर्वाधिक २४ हजार ८९६ रुग्ण एक दिवसात आढळले होते. आज २५ हजार ८३३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. नागपूर, औरंगाबाद, अमरावतीसह अनेक शहरांमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीही दैनंदिन बाधितांची संख्या आपले जुने विक्रम मोडीत काढत आहे. गुरुवारी राज्यात २३ हजारापेक्षा जास्त नव्या रुग्णांची भर पडली.

    राज्यातील १५ हजार कोरोनाबाधित रुग्णांपैकी गंभीर रुग्णांचे प्रमाण ४०० एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात पुन्हा लॉकडाऊन न लावता कडक निर्बंध लावले जातील, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही चिंतेची बाब असून कोविड नियंत्रण उपयोजना सुरू आहे. राज्यात लवकरच कडक निर्बंध लावले जाणार आहे. राज्य सरकार लवकरच नवीन नियामवली जाहीर करणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

    लोकांनी कोरोनाबाबतचे सर्व निकष पाळणं गरजेचं आहे. अन्यथा, कोरोनाचा प्रसार रोखणे अशक्य आहे.