सायन रूग्णालयातील १०० पेक्षा अधिक डॉक्टर्स कोरोनाच्या विळख्यात, डॉक्टरांवर कामाचा अतिताण

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच वेगवेगळया पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार देणारे डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह होण्याची संख्या ही वाढत आहे.

मुंबई:  मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच वेगवेगळया पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार देणारे डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह होण्याची संख्या ही वाढत आहे. मुंबई पालिकेच्या सायन रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील अनेक डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यामुळे, रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता भासत आहे, शिवाय इतर डॉक्टरांवर अतिताण येत आहे. 

कोरोनामुळे डॉक्टर्स संसर्गित झाल्यामुळे अजून समस्या वाढत आहेत. सायन रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १००  हून अधिक डॉक्टर्स कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. यापैकी बहुतांशी डॉक्टर्स उपचार घेत आहेत.  निवासी डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह होण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे सायन रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. धारावी जवळ असल्याने सर्वच प्रकारचे रुग्ण सायन रुग्णालयात दाखल होतात. तर, सायन रुग्णालयात कोविड आणि नॉन कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. ज्यामुळे, एकाच डॉक्टरला कधी इथे तर कधी तिथे काम करावे लागते. 
सायन रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण १०० हून अधिक वेगवेगळ्या विभागातील डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह झाले असुन त्यात ७८ आरएमओ डॉक्टर्स, सुपर स्पेशालिटी आरएमओ २ तर ७ निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. 
 
बरेच डॉक्टर्स पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यापैकी अनेकांनी पुन्हा ड्यूटी जॉईन केली आहे. १०० डॉक्टरांपैकी ५० ते ६० टक्के डॉक्टर्स बरे होऊन कामावर रुजू झाले आहेत.- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, सायन रुग्णालय 

सायन रुग्णालयात १०० हून अधिक डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, त्यापैकी ७८ आरएमओचा समावेश आहे. सायनमध्ये अनेक प्रकारचे रुग्ण येत आहेत. त्यामुळे गर्दी ही मोठ्या प्रमाणात होत आहे. – डॉ. अविनाश साकनुरे, अध्यक्ष, सायन हॉस्पिटल मार्ड
 
 
दुसर्या रुग्णालयात गेले डॉक्टर्स- 
 
सायन रुग्णालयात एकूण 500 निवासी डॉक्टर्स कार्यरत आहेत. मात्र, यातील जवळपास 250 डॉक्टरांना पालिकेच्या इतर रुग्णालयात आणि जंबो केंद्रात ड्यूटी लावण्यात आली आहे. उर्वरित 250 मधील 100 डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे, आता जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त भार पडला आहे.