मुंबई विमानतळावर उद्यापासून १०० विमानांची लगबग

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशांतर्गत विमान उड्डाणांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. उद्यापासून विमानतळावर १०० विमानांची ये-जा असणार आहे. यात बाहेरुन येणाऱ्या विमानांची

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशांतर्गत विमान उड्डाणांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. उद्यापासून विमानतळावर १०० विमानांची ये-जा असणार आहे. यात बाहेरुन येणाऱ्या विमानांची संख्या ५० असणार आहे, तर मुंबई विमानतळावरुन उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या ५० असेल. जीवीकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानांची संख्या वाढल्याने आत्तापर्यंत लॉकडाऊनमुळे ज्या ठिकाणी जाणे शक्य होत नव्हते, त्या ठिकाणी पोहचणे शक्य होणार आहे. तर विमानतळावरील वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विमानतळावर कोरोना संक्रमण होऊ नये यासाठीच्या उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत, तसेच विमानतळ परिसरातील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.