‘या’ राज्यांमध्ये पेट्रोलची शंभरी पार ; पेट्रोल ३ रुपये तर डिझेल ८८ पैशांनी महागले

१४ वेळा झालेल्या दरवाढीतून पेट्रोल लिटरमागे तीन रुपये २८ पैशांनी, तर डिझेल तीन रुपये ८८ पैशांनी महागले आहे. परिणामी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, उत्तर महाराष्ट्रात नाशिक (९९.८७ रुपये) वगळता सर्व जिल्हे, विदर्भात चंद्रपूर (९९.८४ रुपये), वर्धा (९९.९२ रुपये) वगळता सर्व जिल्हे, तर पालघरचा अपवाद करता कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे.

    मुंबई: सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये गुरुवारी विक्रमी उच्चांक गाठला आहे. १४ व्या दरवाढीने राज्यातील ३६ पैकी ३० जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरीपार मजल मारली असून, याला अपवाद ठरलेल्या मुंबई, पुणे, नाशिक, वर्धा, चंद्रपूर आणि पालघरमध्येही किमती शंभरीच्या वेशीवर आहेत.मुंबई आणि पुण्यात पेट्रोलचे दर गुरुवारी लिटरमागे अनुक्रमे ९९.९४ रुपये आणि ९९.८९ रुपये असे होते. डिझेलचे दरही राज्यातील सर्व जिल्ह्यांत ९० रुपयांच्या पुढे गेले आहेत. मुंबई-पुण्यात डिझेल लिटरमागे अनुक्रमे ९१.८७ रुपये आणि ९०.४१ रुपये अशा किमतीत विकले जात होते.

    पाच विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या काळात देशभरातील पेट्रोल -डिझेलच्या किंमती मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. मात्र २ मे ला रोजी निवडणुकांचा निकाल लागला आणि ४ मेपासून किमतीत सुरू झालेली तीव्र स्वरूपाची वाढ ही मधल्या काळातील विश्रांतीही भरून काढणारी ठरली आहे.
    १४ वेळा झालेल्या दरवाढीतून पेट्रोल लिटरमागे तीन रुपये २८ पैशांनी, तर डिझेल तीन रुपये ८८ पैशांनी महागले आहे. परिणामी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे, उत्तर महाराष्ट्रात नाशिक (९९.८७ रुपये) वगळता सर्व जिल्हे, विदर्भात चंद्रपूर (९९.८४ रुपये), वर्धा (९९.९२ रुपये) वगळता सर्व जिल्हे, तर पालघरचा अपवाद करता कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. पालघरमध्ये पेट्रोल लिटरमागे ९९ रुपये ६१ पैशांनी म्हणजे राज्यात सर्वात स्वस्त दरात गुरुवारी उपलब्ध होते.