‘नाणार’चे समर्थन करत शेकडो शिवसैनिक भाजपात

शिवसेनेतील एका गटाने नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले आहे. तर दुसरा गट रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधी भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे. याच वादातून रत्नागिरी रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. प्रकल्पाच्या बाबतीत समर्थनाची भूमिका घेतलेले शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये नाणार रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश करताना स्थानिक शिवसैनिकांनी नाणारचे समर्थन केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्षाकडून नाणार रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या लोकांचे दडपशाहीने निलंबन करण्यात येत होते. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी खदखद पाहायला मिळत होती. त्यामुळे शिवसेनेत दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत.

    शिवसेनेतील एका गटाने नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले आहे. तर दुसरा गट रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधी भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे. याच वादातून रत्नागिरी रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. प्रकल्पाच्या बाबतीत समर्थनाची भूमिका घेतलेले शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    तारळ, कुंभवडे, अणुसुरे आणि मिठगवाणेमधील शिवसेना कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहे. रिफायनरीला समर्थन केल्याने शिवसेनेतून हकालपट्टी झालेले नाणारचे विभाग प्रमुख राजा काजवे देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात होते. नाणारचे उपविभाग प्रमुख सुहास कुवरे देखील भाजपचा झेंडा हाती धरणार आहेत. तसंच, कोकण जनकल्याण प्रतिष्ठान अध्यक्ष पंढरीनाथ आंर्बेरकर यांचा सुद्धा समावेश असल्याचे बोलले जात आहे.