months worth rain just twelve hours mumbaikars have suffered

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील किनारपट्टीवर हाहा:कार माजवला. ‘पी ३०५’ या बार्जवरील काही कर्मचारी अद्यापही बेपत्ता असून आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्याचप्रमाणे वादळीवाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे येथील मासेमारी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, तर दुसरीकडे मच्छिमार मदतीच्या आशेत आहेत. हे असतानाच आता मुंबईत पुन्हा चक्रीवादळामुळे पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

    मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील किनारपट्टीवर हाहा:कार माजवला. ‘पी ३०५’ या बार्जवरील काही कर्मचारी अद्यापही बेपत्ता असून आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्याचप्रमाणे वादळीवाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे येथील मासेमारी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, तर दुसरीकडे मच्छिमार मदतीच्या आशेत आहेत. हे असतानाच आता मुंबईत पुन्हा चक्रीवादळामुळे पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

    बंगालच्या खाडीत येत्या २५ मे रोजी ‘यास’ चक्रीवादळ धडकणार आहे. त्याचा परिणाम मुंबईसह राज्यातील काही भागात आणि गोव्यातही दिसून येऊ शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने शनिवारी दिली. येत्या सोमवारी आणि मंगळवारी मुंबईत पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, साऊथ वेस्टहून मान्सून अंदमान आणि निकोबार बेटावर दाखल झाला असून १ जूनला केरळनंतर १० जूनपर्यंत महाराष्ट्र, मुंबईत मान्सून धडकणार आहे. त्यातच आणखी एक चक्रीवादळ २५ मे दरम्यान बंगालच्या सागरावर येणार आहे. त्याचा मुख्यत्वे प्रभाव पूर्व किनारपट्टीवर राहणार आहे. परंतु, या चक्रीवादळामुळे मुंबईतही मुसळधार पाऊस कोसळणार असून हवेचा वेग ३० ते ४० कि.मी.पर्यंत राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईसह महाराष्ट्र आणि गोव्यात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    भारताच्या पूर्व भागाला ‘यास’ चक्रीवादळाच्या धोक्याचा इशारा देण्यात आला. यास चक्रीवादळ गेल्या वर्षी आलेल्या ‘अम्फान’ वादळाची पुन्हा एकदा आठवण करून देऊ शकते, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. येत्या २६ – २७ मे रोजी ‘यास’ चक्रीवादळ भारताच्या पूर्वेकडील राज्यांना धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ‘अम्फान’ पेक्षाही जास्त भयंकर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    अंदमान – निकोबार बेटांवर २३ मे रोजी हलक्या – मध्यम पावसाची शक्यता आहे. यावेळी ४५ ते ६५ किमी प्रती तास वेगाने वारे वाहू शकतात. पुढच्या ७२ तासांत ही परिस्थिती चक्रीवादळाचे रुप घेऊ शकते. २३ मेपासून वाऱ्याचा वेग वाढून ५० ते ७० किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहू शकतात. दरम्यान, या चक्रीवादळाचा मुंबईवरही परिणाम हाेण्याची शक्यता आहे. मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी पाऊस कोसळू शकतो, असे आयएमडीने म्हटले आहे.