mumbai-local

 हार्बर लाईनवरील गोवंडी(govandi) परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. एका पत्नीला पतीने चक्क चालत्या लोकलमधून(man pushed his wife from local) ढकलून दिल्याचा प्रकार घडला आहे.

हार्बर लाईनवरील गोवंडी(govandi) परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. एका पत्नीला पतीने चक्क चालत्या लोकलमधून(man pushed his wife from local) ढकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. लोकलमधील एका प्रवाशी महिलेने हा प्रकार बघितल्यावर पोलिसांना कळवला आणि पोलिसांनी त्या माणसाला अटक केली. अन्वर अली शेख असं आरोपी तरुणाचं नाव आहे.

अन्वरचं लग्न एका महिन्यापूर्वी पूनम चव्हाणसोबत झालं होतं. पूनमचं हे दुसरं लग्न होतं. पूनमला आधीच्या नवऱ्यापासून एक तीन वर्षांची मुलगी आहे.पूनम आणि अन्वर लग्नानंतर मानखुर्दमधील चाळीत राहात होते. छोटी मोठी कामं करून ते दोघे उदरनिर्वाह करायचे. सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पूनम व शेख हे लोकलने प्रवास करत होते. त्यावेळी अन्वर शेखने पूनमला भरधाव लोकलमधून ढकलून दिलं. मात्र त्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलेनं ही घटना बघितली. त्या महिलेने मानखुर्द पोलिसांना त्याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी अन्वर शेखला अटक केली.

अन्वर आणि पूनम लोकलमधून प्रवास करत होते. पूनम दरवाज्याजवळ असलेल्या खांबाला पकडून उभी होती. काही वेळाने अन्वर तिच्या जवळ गेला. त्याने तिला मिठी मारली. मग तिने खांब सोडला व तशीच दारात उभी राहिली. मग त्याने तिला मिठीतून सोडले आणि पूनम खाली कोसळली. पूनम पडल्यानंतरही अन्वरकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर सहप्रवासी महिलेने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.