मी तर यातला छोटासा हिस्सा… शिवसेनेच्या नेत्याच्या सहभागाची सचिन वाझेंनी NIAच्या चौकशीत दिली कबुली दिल्याचा भाजपाचा दावा

मी तर यातला छोटासा हिस्सा आहे. यामध्ये काही शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग असल्याची कबुली सचिन वाझेंनी एनआयएकडे दिल्याचा दावादेखील भाजपाने केला आहे. भाजपाच्या या दाव्यानंतर राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

    मुंबई: भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटरवर, सचिन वाझेंनी चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नावं घेतली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच मी तर यातला छोटासा हिस्सा आहे. यामध्ये काही शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग असल्याची कबुली सचिन वाझेंनी एनआयएकडे दिल्याचा दावादेखील भाजपाने केला आहे. भाजपाच्या या दाव्यानंतर राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांनतर भाजप अधिक आक्रमक झाले आहे.

    ‘एनआयए’ला तपासादरम्यान अनेक पुरावे मिळाले असून आणखी बरीच माहिती समोर येईलच, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील आता मोठा दावा करण्यात आला आहे. भाजपा महाराष्ट्र या ट्विटर हॅण्डलवरून ठाकरे सरकार यालाही मीच जबाबर असे हॅशटॅग वापरत अनेक दावे करण्यात आले आहेत.

    राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी ही स्फोटके पेरण्यामागील मास्टरमाईंड शोधण्यासाठी एनआयएने मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागातील अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली.