sambhaji raje - vadettivar

मराठा समाज ओबीसीमध्ये का समाविष्ट करत नाही, असं मी खासगीमध्येसुद्धा बोललो नाही. २७ टक्के आरक्षण ओबीसींसाठी आहे, त्या व्यतिरिक्त तुम्ही घ्या, अस मी खासगीमध्ये बोललो. राजेंचा गैरसमज झाला आणि त्यातून ते बोलले असावेत. मी त्यासाठी तयार नाही, ओबीसींमध्ये मराठ्यांना समाविष्ट करू नये, असंच मी नेहमी म्हणत आलो आहे. त्यांना आरक्षण मिळावं मात्र आमचं नुकसान होऊ नये.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) आणि मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar ) यांच्यामधील शाब्दिक चकमकीला वादाचे रुप येत आहे. तुम्ही ओबीसीत (OBC) का येत नाही? असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केल्याचा दावा संभाजीराजे यांनी केला होता. यावरच वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आणि संभाजीराजेंनी केलेला दावा फेटाळला आहे.

मंत्री विजय वडेट्टीवर यांनी संभाजीराजेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, संभीजीराजे अर्धवट बोलले, ते पूर्ण बोलले नाहीत, यामुळे मला खेद आहे. असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ओबीसीमध्ये यायचं असेल तर २७ टक्के आरक्षणामध्ये तुमचं २७ टक्के आरक्षण जोडा आणि वेगळा प्रवर्ग करा, असं संभाजी राजेंना मी म्हणालो असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ओबीसीसाठी जी लढाई मी लढत आहेत. त्याची धार बोथट करण्याची ही खेळी असावी असे विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला.

मराठा समाज ओबीसीमध्ये का समाविष्ट करत नाही, असं मी खासगीमध्येसुद्धा बोललो नाही. २७ टक्के आरक्षण ओबीसींसाठी आहे, त्या व्यतिरिक्त तुम्ही घ्या, अस मी खासगीमध्ये बोललो. राजेंचा गैरसमज झाला आणि त्यातून ते बोलले असावेत. मी त्यासाठी तयार नाही, ओबीसींमध्ये मराठ्यांना समाविष्ट करू नये, असंच मी नेहमी म्हणत आलो आहे. त्यांना आरक्षण मिळावं मात्र आमचं नुकसान होऊ नये. ओबीसींच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का, हेसुद्धा समजायला पर्याय नसल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. संभाजीराजेंनी केंद्र सरकारकडे विषय न्यावा, मग त्यावर काम लवकर होईल. आमच्या ओबीसींसाठी मी काम करत आहे, त्यात काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.