मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, कोविड काळात मी एक दिवसही घरी बसलो नाही – देवेंद्र फडणवीस

गेली दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलं नाही, की आता मी मुख्यमंत्री नाहीए, विरोधी पक्ष नेता म्हणून मी उत्तम काम करतोय, आणि ज्या दिवशी आशिर्वाद मिळेत त्या दिवशी पहिल्यांदाच इथं गोवर्धनी मातेकडेच येणार आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्याचं कारण नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    नवी मुंबई -: “कोविड काळात मी एक दिवसही घरी बसलेलो नाही. सात्त्याने जनतेच्या सेवेत आहे. त्यामूळे जनता मला मुख्यमंत्री नसल्याचे विसरू देत नाही; मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. शेवटी मनुष्य कोणत्या पदावर आहे ते महत्वाचे नाही तर तो काय करतो हे महत्वाचे आहे.” असे म्हणत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा कायम असल्याचे दाखवून तर दिलेच मात्र घरी बसून निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला देखील लगावला आहे. मात्र फडणवीसांच्या वक्तव्याने मी पुन्हा येईन या वाक्याची आठवण ताजी झाल्याचे दिसून आले. फडणवीस हे आमदार मंदा म्हात्रे आयोजित नवरात्रोत्सवात गोवर्धनी मातेच्या दर्शनाला आले होते त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते.

    देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे राजकीयव वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. सत्ता गेल्याचे दु:ख वाटले असे विधान करुन देवेंद्र फडणवीस या आधी चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाबाबत विधान करुन फडणवीस चर्चेत आहेत.

    गेली दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलं नाही, की आता मी मुख्यमंत्री नाहीए, विरोधी पक्ष नेता म्हणून मी उत्तम काम करतोय, आणि ज्या दिवशी आशिर्वाद मिळेत त्या दिवशी पहिल्यांदाच इथं गोवर्धनी मातेकडेच येणार आहे. त्यामुळे त्याची काळजी करण्याचं कारण नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    आमदार मंदा म्हात्रे या जनसामान्यांचं काम करतात. आगरी, कोळी आणि महिलांच्या विकासाची कामे ते सातत्याने करतात. मुंबई-पुणे एक्सप्रेस हाय वेवर महिलांसाठी फिरते शौचालयाची सोय करणं हे फक्त आमच्या ताईच करू शकतात. आमच्या मंदाताई महिलांचं सशक्तीकरण करण्यात नेहमीच पुढाकार घेत असतात, अशा शब्दात फडणवीस यांनी मंदा म्हात्रे यांचं कौतुक केलं. नवी मुंबईत पुन्हा आम्हीच निवडून येऊ आणि आम्ही पुन्हा एकदा सेवा करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.