संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तांतराची सल अजूनही भाजपा नेत्यांच्या मनातून गेली नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. विरोधी पक्ष म्हणून फिरतानाही मला लोकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. ते पाहून मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते, असे फडणवीस म्हणाले(Devendra Fadnavis).

    मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तांतराची सल अजूनही भाजपा नेत्यांच्या मनातून गेली नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. विरोधी पक्ष म्हणून फिरतानाही मला लोकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. ते पाहून मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते, असे फडणवीस म्हणाले(Devendra Fadnavis).

    याचबरोबर विरोधी पक्षनेते म्हणून आपण उत्तम काम करीत असल्याची पावतीही त्यांनी स्वत:लाच दिली आहे. फडणवीस यांच्या हस्ते बेलापुरमध्ये महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. शिवाय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यावरून त्यांना टोमणेही हाणले आहे.

    मला एकही दिवस जाणवले नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असे वाटते मी आजही मुख्यमंत्री आहे. मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्त्वाचे नाही, तो काय करतो हे महत्त्वाचे आहे. गेले दोन वर्ष घरात एकही दिवस न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला कधी जनतेने हे जाणवूच दिले नाही की आता मी मुख्यमंत्री नाही. विरोधी पक्षनेते म्हणून मी उत्तम काम करत आहे.

    - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते