दुसऱ्या पक्षातल्या लोकांना सल्ला देण्याचा मला अधिकार नाही

दुसऱ्या पक्षातील प्रमुख लोकांना सल्ला देण्याचा मला अधिकार नाही. आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावर भाष्य करायचं काम मी करत असतो. काल एक प्रकार घडला. तो मीडियाने घडवला, याच्या पलिकडे त्याला महत्त्व नाही. असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांच्यावर मार्मिक टिप्पणी केली असता, राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या मुदद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना? अशी शंका घेण्यास वाव असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

तसेच यामध्ये संयमाचा सल्ला सुद्धा पार्थ पवारांना दिला आहे. दुसऱ्या पक्षातील प्रमुख लोकांना सल्ला देण्याचा मला अधिकार नाही. आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावर भाष्य करायचं काम मी करत असतो. काल एक प्रकार घडला. तो मीडियाने घडवला, याच्या पलिकडे त्याला महत्त्व नाही. असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, खरंतर तो विषय राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षांतर्गत विषय आहे. तो शरद पवार यांच्या कुटुंबातील अत्यंत अंतर्गत विषय आहे. त्याच्यावर बाहेरच्यांनी बोलू नये. मला वाटतं पवार कुटुंब आणि त्यांचा पक्ष हे त्याविषयी चर्चा करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी सक्षम आहेत. त्याविषयावर त्या पक्षाचेच प्रवक्ते बोलतील. पवार कुटुंबातील कुणीतरी बोलतील, मी कशासाठी बोलावं?