मला अभिव्यक्त होण्याच स्वातंत्र्य आहे, कंगनाचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

कंगनाने मुंबईचे पाकव्याप्त केलेल्या मुद्द्यावरुन कंगनाविरुद्ध महाराष्ट्रातील नेत्यांनी तसेच शिवसेनेच्या रणरागिनींनी आंदोलन केले. आणि कंगनाला इशारा देण्यात आला. यावरुन राज्याच्या राजकीय वातावरणात मोठा गदारोळ झाला होता.

मुंबई : कंगना रणौतने मुंबई पोलीसांवर टीका केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईतन येण्याची धनमकी दिल्याचा आरोप कंगनाने केला होता. आरोप करताना कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यामुळे महाराष्ट्रीतल राजकीय नेत्यांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला. यावर कंगना रणौतने व्हिडीओच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे.


कंगनाने मुंबईचे पाकव्याप्त केलेल्या मुद्द्यावरुन कंगनाविरुद्ध महाराष्ट्रातील नेत्यांनी तसेच शिवसेनेच्या रणरागिनींनी आंदोलन केले. आणि कंगनाला इशारा देण्यात आला. यावरुन राज्याच्या राजकीय वातावरणात मोठा गदारोळ झाला होता. आज रविवार ६ सप्टेंबर २०२० रोजी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितल्यास तिला माफ करण्याचा विचार करु असे वक्तव्य केले होते. त्याला कंगनाने प्रत्युत्तर दिले आहे.

कंगना रणौत व्हिडीओंमध्ये म्हणाली की, संजय राऊतजी तुम्ही मला म्हणालात मी हरामखोर मुलगी आहे. तुम्ही एक सरकारी मंत्री आहात, तुम्हाला माहित असेल की ह्या देशात प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक तासाला महिलांवर अत्याचारांचे प्रमाण आणि बलात्कारांचे प्रमाण वाढले आहे. त्यांची हत्या करुन शरीर कापून फेकले जात आहेत. अॅसिड अटॅक केले जात आहेत. महिलांना कामावर शिव्या दिल्या जातात. त्यांचे पती त्यांना मारहाण करताना तोंड, कान, दात तोडतात याला जबाबदार मानसिकता आहे. ज्याचे तुम्ही महाराष्ट्रात प्रदर्शन केले आहे. तीच मानसिकता ह्याला जबाबदार आहे.

देशातील मुली तुम्हाला माफ नाही करणार कारण महिलांचे शोषण करणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालत आहात. जेव्हा अमिर खान, नसरुद्दीन शहा म्हणाले होते की त्यांना ह्या देशात राहण्याची भीती वाटत आहे. तेव्हा त्यांना कोणी हारामखोर नाही म्हणाले. पहिली मी मुंबई पोलीसांची स्तुती करताना थकत नव्हती, तुम्ही माजे जुने व्हिडीओ पाहू शकता. परंतु आज पालघरमध्ये पोलिसांसमोर समूहाने साधूची हत्या केली. तेव्हा काही नाही केले तिथे पोलीस उभे होते. तसेच लाचार वडील सुशांत सिंग राजपूतचे वडीलांची एफआय़आर नाही घेत. अशा बाबतीच्या व्यवहाराचा मी निषेध करते तर ते माझे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे.

संजयजी मी तुमची नींदा करते तुम्ही महाराष्ट्र नाही आहात. तुम्ही असे नाही म्हणू शकत मी महाराष्ट्राची निंदा केली. तसेच मी ९ सप्टेंबरला येत आहे. तुमचे लोकं म्हणाले आहेत की माझे तोंड फोडणार आहे. माला मारणार आहात. परंतु तुम्ही मला मारहाण का करणार आहात, कारण या देशाची जी माती आहे ती अशाच लोकांच्या रक्ताने भीजलेली आहे. त्यामुळे ह्या देशाच्या अस्मितेसाठी अनेक लोकांनी जीवनदान केले आहे. आणि आम्ही पण देणार आहोत कारण आम्हाला पण मातीचे कर्ज फेडायचे आह. भेटूया ९ सप्टेंबरला, जय हिंद, जय महाराष्ट्र असे कंगना रणौत म्हणाली आहे. आता यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.