पालिकेच्या शाळांमध्ये आयबीच्या शाळा सुरू होणार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची ग्वाही

पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले की, प्रत्येक विभागामध्ये एक स्वतंत्र सीबीएसई, आयसीएसई बोर्डाची शाळा सुरु करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच २४ वस्तूचे विनामूल्य वाटप असो किंवा खेळांमध्ये फिफासोबत केलेला करार असो, यासर्व बाबी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालिका राबवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    मुंबई – सध्या अस्तित्वात असलेल्या पालिकेच्या शाळांमध्ये भविष्यात आयबीच्या शाळा सुद्धा सुरू करण्यात येणार असून या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देण्यात येणार असल्याची ग्वाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यांच्या हस्ते पवई येथील सीबीएसई मुंबई पब्लिक स्कूलचे उद्घाटन झाले.पवई, कुर्ला( पश्चिम) तुंगा व्हिलेज येथील सीबीएसई मुंबई पब्लिक स्कूलचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झाले. या समारंभात बोलत होते.

    पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले की, प्रत्येक विभागामध्ये एक स्वतंत्र सीबीएसई, आयसीएसई बोर्डाची शाळा सुरु करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच २४ वस्तूचे विनामूल्य वाटप असो किंवा खेळांमध्ये फिफासोबत केलेला करार असो, यासर्व बाबी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालिका राबवित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना महापालिका शाळांमध्ये चांगले शिक्षण मिळत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पालिकेच्या शाळांमध्ये शिकणारी मुले सर्वसाधारण कुटुंबातील असून त्यांच्या इच्छेनुसार त्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने सीबीएसई- आयसीएसई शाळा पालिकेने सुरू केल्या आहेत.

    या सीबीएसई- आयसीएसई शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मिळत आहे त्याचा मला आनंद आहे. भविष्यात पालिकेच्या शाळांमध्ये आयबीच्या शाळा सुद्धा सुरू करण्यात येणार असून या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार दिलीप लांडे याप्रसंगी शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, राहुल कनाल, शिक्षणाधिकारी महेश पालकर, उप शिक्षणाधिकारी संगीता तेरे आदी उपस्थित होते.