प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मराठमोळे मूर्तीकार अनिल राम सुतार हे प्रभु रामचंद्राची मूर्ती साकारणार आहेत. ही मूर्ती जगातील सर्वात उंच मूर्ती असल्याचं त्यांनी सांगितलंय. या मूर्तीची उंची २५१ मीटर म्हणजेच ८२० फूट असणार आहे. ही मूर्ती कास्य धातूची असणार आहे. या मूर्तीसाठी तयार होत असलेला चबुतरा ५१ मीटर उंचीचा आहे, तर त्यावर २०० मीटर उंचीची रामाची मूर्ती उभी राहणार आहे. 

    राममंदिरावरून सुरू असणारा वाद न्यायालयाच्या निर्णय़ानंतर संपुष्टात आल्यानंतर आता राममंदिर निर्माणाचं काम उत्साहात सुरू आहे. राममंदिराची ब्लू प्रिटं तयार झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालीय. या राममंदिर प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा असणार आहे प्रभू रामचंद्राची मूर्ती.

    मराठमोळे मूर्तीकार अनिल राम सुतार हे प्रभु रामचंद्राची मूर्ती साकारणार आहेत. ही मूर्ती जगातील सर्वात उंच मूर्ती असल्याचं त्यांनी सांगितलंय. या मूर्तीची उंची २५१ मीटर म्हणजेच ८२० फूट असणार आहे. ही मूर्ती कास्य धातूची असणार आहे. या मूर्तीसाठी तयार होत असलेला चबुतरा ५१ मीटर उंचीचा आहे, तर त्यावर २०० मीटर उंचीची रामाची मूर्ती उभी राहणार आहे.

    या राममंदिर निर्माणासाठी देशभरात निधी गोळा करण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं करण्यात येतंय. नव्वदच्या दशकापासून भारतीय राजकारणात राममंदिराचा मुद्दा हा प्रमुख राजकीय मुद्दा राहिलाय. भारतीय राजकारण याच मुद्द्याभोवती फिरत आलीय. अनेक निवडणुका या मुद्द्यावरून लढल्या गेल्या आणि देशातील सत्तांतरालाही हाच मुद्दा कारणीभूत ठरला.

    गेल्या वर्षी ५ ऑगस्ट २०२० ला राममंदिराचा पायाभरणी समारंभ पार पडल्यानंतर आता या मंदिराच्या निर्माणकार्यानं वेग घेतलाय.