chandrakant patil

चंद्रकांत पाटील हे एका मुलाखतीदरम्यान म्हणाले की, जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटले तर नक्कीच राजकीय चर्चा करणार, ते दोन ते अडीच तास एकत्र बसून चहावर चर्चा करणार नाहीत. पण त्यांची भेट कोणतीही निर्णयात्मक स्वरुपाची नव्हती. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यध्य चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीमुळे ( Raut-Fadnavis meetingP राज्यातील राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे. या दोन बड्या नेत्यांच्या अचानक भेटीमुळे राज्यात खळबळ माजली आहे. तर यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जर का दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटत असतील तर ते नक्कीच राजकीय चर्चा करणार. फक्त दो ते अडीच तास चहा बिस्किटावर थोडी चर्चा करणार आहेत. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील हे एका मुलाखतीदरम्यान म्हणाले की, जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटले ( meeting ) तर नक्कीच राजकीय चर्चा करणार, ते दोन ते अडीच तास एकत्र बसून चहावर चर्चा करणार नाहीत. पण त्यांची भेट कोणतीही निर्णयात्मक स्वरुपाची नव्हती. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यध्य चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.


राज्याच्या राजकारणात अचानक ‘काहीतरी’ घडेल, असे भाकित भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले. काही वेगळी राजकीय समीकरणे समोर येतील, असे संकेतही त्यांनी दिले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

आजच्या घडीला विधानसभेची मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे. त्यात केवळ पैसाच खर्च होतो असा नाही, आज कोरोनाचे संकट आहे. त्यात निवडणूक घेणे शक्य नाही. अशावेळी सध्याच्या सरकारला काहीतरी पर्याय नक्कीच उभा राहील. निवडणूक न होण्यासाठी सगळेच प्रयत्न करतील पण कोणतेच समीकरण जुळले नाही तर मग पर्याय नसेल, असेही ते म्हणाले. भाजप राज्यात यापुढील सर्व निवडणुका स्वबळावरच लढेल असे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यातील भेटीत राजकीय विषयही होते पण त्यातून निष्पन्न काहीही झाले नाही. या भेटीमुळे राज्यात काही बदल होतील असे वाटत नसल्याचे पाटील म्हणाले.