“फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर..” सामनातून भाजपसह राणेंना इशारा

    मुंबई – मंगळवारी सुरु झालेला शिवसेना विरुध्द नारायण राणे वाद अजून काही थांबलेला नाही. जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी (काल बुधवार दिनांक 27 ऑगस्ट) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी “अरे मी काय सामान्य माणूस वाटलो काय? तुम्ही माझं काही वाकडं करु शकत नाही.” असं म्हणत शिवसेनेना पुन्हा एकदा शिवसेनेला आव्हान दिलं. त्यामुळे आता शिसवेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून “राणे हे ‘नॉर्मल’ मनुष्य नसल्यानेच त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखले. भाजपने आता तरी शहाणे व्हावे!” असं आवाहन भाजपला करण्यात आलं आहे.

    काय म्हटलंय सामनात?

    घरात व दारात भरपूर गांजाची शेती पिकवायची व त्याच गांजाचे सेवन करून कुणावरही कसेही बकायचे हा सध्या अनेक राजकारण्यांचा धंदा झाला आहे. ही गांजाची शेती कायद्यानेच बंद केली पाहिजे व त्याची सुरुवात केल्याबद्दल महाराष्ट्राची जनता ठाकरे सरकारला धन्यवाद देत आहे. फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर त्यांची नशा लवकरात लवकर उतरो हीच ‘अटल’चरणी प्रार्थना, दुसरे काय बोलायचे!

    कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारून पडण्याइतके सोपे नाही. हा महाराष्ट्र आहे, तरीही ‘वर आमचे सरकार आहे! महाराष्ट्र केंद्राशी काय संघर्ष करणार?’ अशी मस्तवाल व महाराष्ट्रविरोधी भाषा राणे नावाचे केंद्रीय मंत्री वापरतात. महाराष्ट्राच्या अस्मितेची इतकी नाचक्की महाराष्ट्राच्या दुष्मनांनीही कधी केली नव्हती. राणे हे ‘नॉर्मल’ मनुष्य नसल्यानेच त्यांनी महाराष्ट्राला कमी लेखले. भाजपने आता तरी शहाणे व्हावे!

    दरम्यान, महाड न्यायालयाने मंगळवारी रात्री उशीरा नारायण राणे यांचा जामीन मंजूर केल्यानंतर “करारा जवाब मिलेगा” असं ट्वीट राणेंचे चिरंजीव नितेश राणे यांनी केलं आहे.