इम्परिकल डाटा सदोष असेल तर केंद्र सरकारच्या योजना कशा सुरू आहेत? मुख्यमंत्र्याचा विरोधकांना गंभीर सवाल

फडणवीस यांच्या मते त्या डेटा मध्ये आठ कोटी चुका आहेत. या शिवाय त्या,मध्ये राज्याशी संबंधित ७२ लाख चुका आहेत तर मी आरोप करत नाही मात्र त्याच माहितीच्या आधारे पंतप्रधान कार्यालयातून जनतेच्या उज्वला योजने सारख्या अनेक योजना कश्या सुरू आहेत? मग या योजनांमध्ये घोटाळा आहे असे म्हणायचे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

  मुंबई : राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणासाठी इम्परिकल डाटा केंद्र सरकार देत नसेल तर त्यातील माहिती जी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस देत आहेत ती कशी मिळाली असा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे.

  या योजनांमध्ये घोटाळा आहे असे म्हणायचे का?

  फडणवीस यांच्या मते त्या डेटा मध्ये आठ कोटी चुका आहेत. या शिवाय त्या,मध्ये राज्याशी संबंधित ७२ लाख चुका आहेत तर मी आरोप करत नाही मात्र त्याच माहितीच्या आधारे पंतप्रधान कार्यालयातून जनतेच्या उज्वला योजने सारख्या अनेक योजना कश्या सुरू आहेत? मग या योजनांमध्ये घोटाळा आहे असे म्हणायचे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

  दर्जा घसरल्याचे काल अनुभवास आले

  विधानभवनात अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॉंग्रेस गट नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत मुख्यमंत्र्यानी पत्रकारांशइ संवाद साधला ते म्हणाले की, काल जो काही प्रकार झाला तो लोकशाहीच्या प्रथा आणि परंपरा यांना काळीमा फासणारा होता. त्यामुळे कामकाजाचा दर्जा राखण्यासाठी आता पुरस्कार देण्याचा कार्यक्रम होत आहे मात्र हा दर्जा घसरल्याचे काल अनुभवास आले आहे.

  इतका थयथयाट कशासाठी

  मुख्यमंत्री म्हणाले की ओबीसींचा डाटा आम्ही पंतप्रधानाच्या भेटीत पत्र देवून या पूर्वी मागितला आहे, शिवाय राज्य पाल यांच्या पत्राला उत्तर देताना त्याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती त्यांना केली आहे. त्या नंतर त्याच विषयावर विधिमंडळात ठराव केला तर इतका थयथयाट कश्यासाठी करण्यात आला? जर ओबीसीना ही माहिती मिळू नये अस व्देष त्या मागे असेल तर तो सदनाबाहेरही व्यक्त करता आला आसता त्यामुळे सभागृहात नको ते घडले आहे.

  अधिवेशनातून जनतेचे समाधान झाले

  ते म्हणाले की कोरोना नंतरच्या स्थितीमध्ये आर्थकारण रूळावर आणायचे आव्हान आहे त्यात सत्तेचे हे राजकारण टाळायला हवे असे आवाहन मी वारंवार करत आहे मात्र विरोधकांना ती भाषा रूचत नसावी. ते म्हणाले की या अधिवेशनातून जनतेचे समाधान झाले हे आमचे काम आहे विरोधकांचे समाधान करणे हे आमचे काम नाही.

  विरोधकांचा बहिष्कार अनाठायी

  उपमुख्यमंत्री अजित पवार यानी यावेळी दोन दिवसांत झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला ते म्हणाले की तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या बाबतीत जे घडले ते त्यांनी खिलाडूपणे घेतले आहे. त्यानंतरही आज त्यांनी बहिष्कार घालणा-या सदस्यांना सदनात येण्याची विनंती केली मात्र त्यांनी येण्यास नकार दिला.