कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितल्यास…, संजय राऊत यांचे मोठे विधान

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितल्यास तिला माफ करण्याचा विचार करु, तसेच कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली तशीच तीने अहमदाबादची तुलना करुन बोलून दाखवावे. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरुन झालेल्या शाब्दिक चकमकीमध्ये कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी कंगनावर टीकेची झोड उठवली होती. यामुळे मोठा वाद पेटला होता. कंगनाच्या वक्तव्या विरोधात महाराष्ट्रात शिवसेनेने आंदोलन देखील केले. तर आता कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितल्यास तिला माफ करण्याचा विचार करु अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मलाखती दरम्यान मांडली आहे.