जर कंगना पुढील तारखेस कोर्टात हजर झाली नाही तर आम्ही अरेस्ट वॉरंट काढू; कोर्टाकडून सूचक इशारा

    मुंबई : जावेद अख्तर ह्यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात मुंबईतील अंधेरी कोर्टाने कांगानला सुनावले. मुंबई उच्च न्यायालयाने ह्या प्रकरणात कंगनाला दिलासा नाकारला होता, त्यामुळे अंधेरी कोर्टात हजर होणे कंगानाला अनिवार्य होते.

    दरम्यान कंगनाला कोरोनाचे लक्षणे आढळली आहेत आणि तिची कोविड चाचणी झाली असून, रिपोर्टसाठी विलंब होत असल्याचे कंगनाचे वकील अॅड सिद्दिकी ह्यांनी कोर्टाला सांगितले. त्यावर जावेद अख्तर ह्यांचे वकील अॅड भारद्वाज ह्यांनी आक्षेप नोंदवला. शेवटी जर कंगना पुढील तारखेस कोर्टात हजर झाली नाही तर आम्ही अरेस्ट वॉरंट काढू अशा साफ शब्दात कोर्टाने सुनावले आणि सुनावणी २० सप्टेंबर पर्यंत तहकूब केली.