Anil Parab's business partner found with Sachin Vaze's Prado car; Kirit Somaiya's sensational allegation

भाजप नेते किरीट सौमय्या यांनी परीवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या आरोपांवरुन आता मोठा वादंग निर्माण झाला आहे. अनिल परब यांनी सोमय्यांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

    मुंबई : भाजप नेते किरीट सौमय्या यांनी परीवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या आरोपांवरुन आता मोठा वादंग निर्माण झाला आहे. अनिल परब यांनी सोमय्यांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

    सोमय्या यांनी परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांचं पुरव्यासह स्पष्टीकरण द्यावं अन्यथा ७२ तासात माफी मागावी नाहीतर किरीट सौमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार अशी नोटीस अनिल परब यांच्या वकिलांनी किरीट सौमय्या यांना पाठवली आहे.

    एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना