sanjay raut

बेळगावात परिस्थिती चिघळत असेल तर त्याला जबाबदार केंद्र सरकार आहे. केंद्र सराकरने हस्तक्षेप करावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. बेळगावात मराठी नागरिकांवर, शिवसेनेच्या कार्यालवर हल्ले होत आहे. त्यामुळे तेथील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.

    मुंबई : बेळगावात मराठी माणासांवर सुरु असलेल्या दडपशाहीविरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक इशारा दिला आहे. बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावं लागेल अशी प्रतिक्रियी दिली आहे. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका असंही राऊतांनी ठणकावले आहे.

    बेळगावात परिस्थिती चिघळत असेल तर त्याला जबाबदार केंद्र सरकार आहे. केंद्र सराकरने हस्तक्षेप करावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. बेळगावात मराठी नागरिकांवर, शिवसेनेच्या कार्यालवर हल्ले होत आहे. त्यामुळे तेथील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत.

    कर्नाटक सरकार बेळगावमध्ये अतिक्रमण करत आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत काही काम करता येणार नाही. तिथे न्यायालयाचा अवमान केला जात असल्याचेही राऊत यांनी सांगीतले.

    दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेळगावला महाराष्ट्रात आणण्याची भूमिका मांडली आहे. त्याआधी तेथील मराठी नागरिकांना संरक्षणाची गरज असल्याची भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे.